-->

संस्थेमध्ये शिक्षक भरती चा नवीन जीआर 2023

संस्थेमध्ये शिक्षक भरती चा नवीन जीआर 2023


 शिक्षक भरती संदर्भात पवित्र पोर्टलव्दारे मुलाखतीसह विकल्पासाठी उमेदवारांची शिफारस करण्यासाठीचे प्रमाण १:१० ऐवजी १:३ असे सुधारीत करणेबाबत.


महाराष्ट्र शासन


शालेय शिक्षण व क्रीडा विभाग


शासन निर्णय क्रमांकः संकीर्ण-२०२३/प्र.क्र.३०२/ टीएनटी-१


मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरू चौक,


मंत्रालय, मुंबई- ४०००३२ दिनांक: ०६ जुलै, २०२३.


संदर्भ :- १. शालेय शिक्षण व क्रीडा विभाग शासन परिपत्रक क्र. एसएससी-


१३९८/२२३०२८/६०९७ / उमाशि-१, दिनांक २२.०६.२०००.


२. शालेय शिक्षण व क्रीडा विभाग शासन निर्णय क्र. एचएससी


१३०५/(६३/०५)/उमाशि - १, दिनांक १.१२.२००५. ३. शालेय शिक्षण व क्रीडा विभाग शासन निर्णय क्र. सीईटी-२०१५/ प्र.क्र. १४९/ टीएनटी-१, दिनांक ७.०२.२०१९. ४. शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, शासन निर्णय क्र. संकीर्ण-२०२२/ प्र.क्र.१०६/टिएनटि-१, दिनांक १०.११.२०२२. ५. आयुक्त (शिक्षण), महाराष्ट्र राज्य, पुणे यांचे पत्र क्रमांक आशिका / शिक्षक


पदभरती / १०६/२०२३/३७८३, दिनांक २२.०६.२०२३.


प्रस्तावना:-


मा. उच्च न्यायालय, मुंबई, खंडपीठ नागपूर येथे दाखल झालेल्या जनहित याचिका क्रमांक ८/२०१५ प्रकरणी मा. उच्च न्यायालयाने दिनांक २४.०६.२०१५ रोजी दिलेल्या आदेशास अनुसरुन शासन निर्णय, दिनांक २३.६.२०१७ अन्वये खाजगी शैक्षणिक संस्थाच्या शाळांमधील शिक्षणसेवकांची रिक्त पदे भरताना सर्व उमेदवारांना निवडीची समान संधी मिळावी व उच्च गुणवत्ताधारक उमेदवारांची निवड व्हावी, यास्तव अभियोग्यता व बुध्दीमत्ता चाचणी यामध्ये मिळालेल्या गुणांच्या आधारावर भरती करण्याचा निर्णय घेण्यात आला. तथापि, याविरोधात मा. उच्च न्यायालय, मुंबई, खंडपीठ नागपूर येथे दाखल झालेल्या रिट याचिका क्रमांक ५०५९/२०१७ प्रकरणी मा. उच्च न्यायालयाने दिनांक २१.११.२०१८ रोजी दिलेल्या आदेशास अनुसरुन शासन निर्णय, दिनांक ७.२.२०१९ अन्वये खाजगी शैक्षणिक संस्थेच्या शाळेमध्ये शिक्षक भरतीसाठी १:१० प्रमाणात मुलाखतीसाठी उमेदवार उपलब्ध करुन देण्याची तरतूद विहीत करण्यात आलेली आहे. परंतु, जनहित याचिका क्रमांक ८/२०१५ प्रकरणी मा. न्यायालयाने दिलेले निर्देश विचारात घेता शिक्षक भरती प्रक्रीयेतील गैरव्यवहार टाळणे व गुणवत्तेवर आधारीत निवड प्रक्रीयेत पारदर्शकता आणणे यासंदर्भात उपाययोजना करण्यामध्ये १:१० प्रमाणात मुलाखतीसाठी उमेदवार उपलब्ध करुन देण्याची तरतूद विहीत करण्यात आल्यामुळे अजूनही अडचणी येत असल्याचे दिसून येत आहे. यासंदर्भात जनहित याचिका क्रमांक ८/२०१५ तसेच रिट याचिका क्रमांक ५०५९/२०१७ प्रकरणी मा. न्यायालयाने दिलेले आदेश विचारात घेऊन खाजगी संस्थाचे शिक्षक निवडीचे व नियुक्तीचे अधिकार अबाधित ठेवून शिक्षक भरती प्रक्रीया अधिक पारदर्शक होण्यासाठी उपाययोजना करणे क्रमप्राप्त असल्याचे शासनाच्या निदर्शनास आले आहे.


शिक्षक भरती करण्यासाठी असलेल्या पवित्र प्रणालीवर नियुक्तीसाठी शिक्षकांची शिफारस करण्यासाठी असलेल्या १:१० प्रमाणाऐवजी १:३ असे प्रमाण करण्याबाबत मा. मंत्रीमंडळाने दिनांक १३.६.२०२३ च्या बैठकीमध्ये निर्देशित केले. तसेच, मा. उपविधान समिती, महाराष्ट्र विधानमंडळ यांच्या दिनांक १.९.२०२१ रोजीच्या बैठकीमध्ये समिती प्रमुखांनी मा. न्यायालयाच्या आदेशानुसार गुणवत्ता व पारदर्शकता राखण्याच्या दृष्टीने ३०. गुणांबाबत शासनाने मानक कार्यपध्दती (Standard Operating Procedure) निर्देशित करावी अशी शिफारस केली आहे. या बाबींच्या अनुषंगाने आयुक्त (शिक्षण) यांनी शासनास प्रस्ताव सादर केला आहे.


वरील सर्व बाबींचा साकल्याने विचार करुन निर्णय निर्गमित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.


शासन निर्णय-


राज्यातील खाजगी व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये अभियोग्यता व बुध्दीमत्ता चाचणीतील गुणांच्या आधारे उच्चतम गुण प्राप्त उमेदवारांपैकी शिक्षण सेवकांची अंतिम निवड मुलाखतीद्वारे संबंधित संस्था करील अशी तरतूद विहीत करण्यात आलेली आहे. शिक्षक अभियोग्यता व बुध्दीमत्ता चाचणी, २०२२ च्या आधारे व तद्नंतर करण्यात येणाऱ्या शिक्षक पद भरतीसाठी मुलाखतीसह विकल्प निवडलेल्या खाजगी व्यवस्थापनांच्या शाळांतील शिक्षणसेवकांच्या निवड प्रक्रीयेमध्ये अधिक पारदर्शकता आणण्याच्या दृष्टीने विहीत कार्यपध्दतीमध्ये खालीलप्रमाणे सुधारणा करण्यात येत आहेत:-


अ)


मुलाखतीसह विकल्प निवडलेल्या खाजगी व्यवस्थापनांच्या शाळां शिक्षण सेवकांच्या मुलाखतीद्वारे अंतिम निवडीसाठी प्रत्येक रिक्त शिक्ष जागेकरीता उपलब्ध असल्यास समांतर आरक्षणासह शासन निर्णय दिना ७.२.२०१९ अन्वये विहीत केलेल्या १:१० प्रमाणाऐवजी १:३ या गुणोत्तराप्रमाणे उमेदवारांचा प्राथम्य क्रम, गुणानुक्रम, पदासाठीचे माध्यम, प्रवर्ग, विषय व बिंदूनामावलीनुसार उच्चतम गुणप्राप्त उमेदवारांची निवडसूची त्या व्यवस्थापनाच्या लॉगिनवर उपलब्ध करुन देण्यात येईल.

आ) संबंधित शैक्षणिक संस्थेने अशा उमेदवारांची मुलाखत घेऊन मुलाखत व अध्यापन कौशल्याद्वारे एकूण ३० गुणांसंदर्भात या उमेदवारांचे गुणपत्रक व निकाल पवित्र प्रणालीवर जाहीर करावयाचा असून त्या आधारे पवित्र पोर्टलमधील शिफारस केलेले आरक्षण व विषय विचारात घेऊन उच्चतम गुणप्राप्त झालेल्या उमेदवाराची रिक्त पदावर निवड करावयाची आहे. त्यानुसार मुलाखत व अध्यापन कौशल्यासाठी विहीत केलेल्या एकूण ३० गुणासंदर्भात आयुक्त (शिक्षण) यांनी मानक कार्यपध्दती (Standard) Operating Procedure) तयार करावी.


२. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेताक २०२३०७०६१७५९४७१६२१ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे. महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.


TUSHAR VASANT MAHAJAN


(तुषार महाजन) उप सचिव, महाराष्ट्र शासन


प्रत:-


१) मा. राज्यपाल महाराष्ट्र राज्य यांचे सचिव, मलबार हिल, मुंबई.


२) मा मुख्यमंत्री यांचे प्रधान सचिव, महाराष्ट्र राज्य मंत्रालय, मुंबई. ३) मा. उपमुख्यमंत्री यांचे प्रधान सचिव, महाराष्ट्र राज्य, मंत्रालय, मुंबई. ५) मा. उपसभापती, महाराष्ट्र विधानपरिषद, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय, मुंबई. ६) मा. अध्यक्ष, महाराष्ट्र विधानसभा, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय, मुंबई.


४) मा. सभापती, महाराष्ट्र विधानपरिषद, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय, मुंबई.


७) मा. उपाध्यक्ष, महाराष्ट्र विधानसभा, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय, मुंबई.. ८) मा. विरोधी पक्षनेता. विधानपरिषद विधानसभा, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय,


मुंबई. ९) मा. मंत्री शालेय शिक्षण यांचे खाजगी सचिव, मंत्रालय, मुंबई-३२. (१०) मा. विधानसभा / विधानपरिषद सदस्य (सर्व).


११) मा. मुख्य सचिव, महाराष्ट्र राज्य, मंत्रालय, मुंबई.


१२) आयुक्त (शिक्षण), महाराष्ट्र राज्य, पुणे. १३) संचालक (प्राथमिक/माध्यमिक व उच्च माध्यमिक), महाराष्ट्र राज्य, पुणे.


(१४) सर्व विभागीय शिक्षण उपसंचालक, १५) सर्व शिक्षणाधिकारी (प्राथमिक/ माध्यमिक) जिल्हा परिषद.


१८) निवडनस्ती- टिएनटि- १.

News

Post a Comment