ZP शिक्षक भरती 2023 : तब्बल अंदाजे 4500 पदांची! शासनाचा नवीन GR | ZP Shikshak Bharti 2023


ZP Shikshak Bharti 2023 : राज्यातील शिक्षक भरतीची प्रतिक्षा संपली आहे. अनुसूचित जमाती पेसा क्षेत्रातील शिक्षक पदभरतीबाबतच्या शासन आदेशानूसार वित्त विभागाच्या परवानगीनुसार रिक्त पदांच्या ८० टक्के रिक्त पदे भरण्यास परवानगी देण्यात आली आहे. यामध्ये अहमदनगर, अमरावती, चंद्रपूर, धुळे, गडचिरोली, जळगांव, नांदेड, नंदूरबार, नाशिक, पालघर, पुणे, ठाणे, यवतमाळ जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांस भरतीस परवागनी देण्यात आली आहे. ST PESA च्या 13 जिल्ह्यातील शिक्षक भरती मध्ये जवळपास 4500 जागा भरण्याचे आदेश शिक्षण आयुक्त सुरज मांढरे यांनी दिले आहे. शिक्षक भरती बाबतीत महाराष्ट्र शासनाचा पूर्ण शासन निर्णय (GR) खाली पहा.

ZP Shikshak Bharti 2023 : अनुसूचित जमाती-पेसा क्षेत्रातील रिक्त पदांसाठी त्या-त्या जिल्ह्यातील उमेदवारच पात्र असल्याने त्यांच्या पदभरतीबाबत शासनाने दिलेली परवानगी विचारात घेवून कार्यवाही करणे आवश्यक आहे. पवित्र प्रणालीमार्फत अनुसूचित जमाती- पेसामधील रिक्त पदे भरली जाणार आहेत.

ZP Shikshak Bharti 2023 : या संदर्भात शिक्षण आयुक्त, शिक्षण आयुक्तालय, पुणे या कार्यालयाकडून पेसा क्षेत्रातील पदभरतीबाबत अन्य पर्यायांचा विचार करण्यासाठी शासनाकडे वेळोवेळी प्रस्ताव सादर करण्यात आले होते. त्यानुसार शासनाचे पत्र दि. १०.०८.२०२३ अन्वये पेसा क्षेत्रातील रिक्त शिक्षक पदे भरण्याकरीता कार्यवाहीस मान्यता देण्यात आली आहे.



Source link

Author

Marathi Breaking News

Delivering authentic and real-time updates on politics, sports, and trending events world wide.