मोठी बातमी : तलाठी व वनरक्षक भरती स्थगित! Talathi Vanrakshak Bharti 2023


Talathi Vanrakshak Bharti 2023 : राज्यात यावेळी तलाठी व वनरक्षक भरतीला स्थगिती देण्यात आली आहे. आदिवासी विकास विभागातर्फे अधिसूचित क्षेत्रांतील गावांमधील सरकारी नोकन्यांत अनुसूचित जमातीसाठी (एसटी) शंभर टक्के आरक्षण ठेवण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयावरून वाद निर्माण झाल्याने तलाठी व वनरक्षक पदांवरील भरती प्रक्रिया ५ डिसेंबरपर्यंत स्थगितच राहणार आहे; कारण हा विषय सध्या सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असून, पुढील सुनावणीपर्यंत भरती प्रक्रिया पुढे नेणार नसल्याची हमी राज्य सरकारने कायम ठेवली आहे.

शंभर टक्के आरक्षणाच्या या वादामुळे भरती प्रक्रियेत सहभागी असलेल्या सुमारे ११ लाख उमेदवारांचे भवितव्य सध्या अनिश्चितच आहे. सरकारने ४ हजार ६४४ तलाठींच्या आणि २ हजार १३८ वनरक्षकांच्या पदांवरील भरतीसाठी जाहिरात देऊन निवडप्रक्रिया सुरू केली होती. 

कोणत्याही घटकाला शंभर टक्के आरक्षण देताच येत नाही; शिवाय आरक्षण ५० टक्क्यांच्या पुढे दिले जाऊ शकत नाही, हे सर्वोच्च न्यायालयाने अनेक निवाड्यांत स्पष्ट केले आहे’, असे निदर्शनास आणून ‘सामाजिक विकास प्रबोधिनी’ आणि ‘बिगर आदिवासी आरक्षण हक्क बचाव’ या संस्यांसह अनेकांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका केल्या होत्या. मात्र, हा विषय ‘मॅट’च्या अखत्यारित असल्याने त्या मंचासमोर जावे, अशी सूचना करून उच्च न्यायालयाने सुनावणीअंती सर्व याचिका फेटाळल्या होत्या.



Source link

Author

Marathi Breaking News

Delivering authentic and real-time updates on politics, sports, and trending events world wide.