-->

मोठी संधी! आपले सरकार सेवा केंद्र देण्यासाठी जाहिरात प्रकाशित! लगेच ऑनलाईन अर्ज करा | Aaple Sarkar Seva Kendra 2023


Aaple Sarkar Seva Kendra 2023 : माहिती तंत्रज्ञान विभाग, मंत्रालय, मुंबई यांचेकडील शासन निर्णयान्वये जिल्हयातील ग्रामीण व महानगरपालीका क्षेत्रात रिक्त असलेल्या ठिकाणी आपले सरकार सेवा केंद्र देण्यास्तव ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. नागरीकांना विविध सेवा गावातच उपलब्ध करून देणे हा हेतू आहे. शासनाने ठरवून दिलेल्या वेळापत्रकानुसार केंद्र चालू ठेवणे, शासनाने ठरवून दिलेले दरपत्रक केंद्रावर दर्शनी भागात प्रसिध्द करणे, तसेच ठरवून दिलेल्या दरापेक्षा अधिक शुल्काची आकारणी न करणे, शासनाने पुरविलेल्या आज्ञावलीचा (software) इ. योग्य वापर, संरक्षण, व जतन करणे अर्जदारांना बंधनकारक राहील. रिक्त असलेल्या गावांची व महानगरपालीका क्षेत्राची यादी व आपले सरकार सेवा केंद्र देण्याची जाहिरात व ऑनलाईन अर्ज लिंक खाली दिली आहे.

◾आपले सरकार सेवा केंद्राना शासनाचे तसेच जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत वेळोवेळी देण्यात येणारे निर्देशांचे पालन करावे लागेल. तसेच उपविभागीय अधिकारी व तहसिलदार यांचे वेळोवेळी दिलेल्या आदेशाचे पालन करावे लागेल. तसेच त्यांना केंद्राबाबत मागविलेला अहवाल तात्काळ सादर करावा लागतील.
◾आवश्यक कागदपत्रे :
1.शैक्षणिक अर्हता प्रमाणपत्र दहावी/बारावी/पदवी 2. संगणक अर्हता प्रमाणपत्र (MS-CIT), 3. आधार कार्ड, 4. पैन कार्ड | अर्जदारांच्या नावाचेच पॅनकार्ड जोडावे, 5. अर्जदार ज्या ग्रामपंचायत / गावाचा रहिवाशी आहे त्या गावातील ग्रामसेवक अथवा तलाठी यांचा रहिवाशी दाखला, 6. अर्जदार महानगरपालीका क्षेत्रातील झोन/ वार्ड चा रहिवाशी असल्यास त्या झोन/ वार्ड चे झोनल अधिकारी यांचा रहिवाशी दाखला 7.जागेच्या मालकी हक्काची कागदपत्रासाठी खालील पैकी एक पुरावा 1] ग्रामपंचायतीचा नमुना नं. ८, 2] घर कर पावती, 3] लाईट बिल, 4] रेशन कार्ड, 5] स्वतःचे घर नसल्यास घरमालकाचे भाडेपत्र (भाडेपत्रा सोबत घरमालकाचे मालमत्ताकर पावती अथवा लाईट बिल जोडावे.)
◾आपले सरकार सेवा केंद्र देण्याची जाहिरात व ऑनलाईन अर्ज लिंक खाली दिली आहे.

◾निकषानूसार अर्ज प्राप्त न झाल्यास गावातील रहिवाश्यांना प्राधान्य देण्यात येईल.
◾निकषानूसार अर्ज प्राप्त न झाल्यास लगतच्या गावातील रहिवासी यांचा विचार करण्यात येईल.
◾आपले सरकार सेवा केंद्र देण्यासाठी ऑनलाईन (Online) अर्ज मागविण्यात आले आहेत.
◾अर्ज शुल्क : रक्कम रू. 500/-.
◾प्रत्येक गावासाठी एक आपले सरकार सेवा केंद्र मंजुर करण्यासाठी जिल्हा सेतू समितीच्या बैठकीमध्ये पात्र अर्जांची निकषानूसार निवड करून अंतिम मान्यता प्रदान करण्यात येईल.
◾आपले सरकार सेवा केंद्र मंजुर झालेल्या केंद्र चालकांनी 01 महिन्यात संबंधित पोलीस स्टेशनचे चारीत्र्य प्रमाणपत्र या कार्यालयास सादर करणे बंधनकारक असेल.



Source link

News

Post a Comment