-->

ठाणे शहर पोलीस भरती 2023 | नवीन पदांची भरती सुरू! | पगार - 28,000 रूपये | Thane City Police Bharti 2023


Thane City Police Bharti 2023 : पोलीस आयुक्त ठाणे शहर कार्यालयाच्या आस्थापनेवर विविध रिक्त पदे भरावयाची आहेत. खालील रिक्त पदे भरण्याकरीता नमूद अटी पूर्ण करीत असलेल्या उमेवारांनाकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्र व इच्छूक उमेदवारांनी लवकरात लवकर आपले अर्ज सादर करावेत. पोलिस आयुक्तलय तसेच पोलीस विभाग मध्ये नोकरी मिळवण्यासाठी चांगली व मोठी संधी निर्माण झालेली आहे. पोलीस आयुक्त ठाणे शहर यांचे कार्यालय येथे रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी नवीन जाहीर केली आहे. भरतीची जाहिरात अपर पोलीस आयुक्त, प्रशासन पोलीस आयुक्त ठाणे द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. इच्छूक व पात्र उमेदवारांनी खाली दिलेली PDF जाहिरात अर्ज करण्यापुर्वी काळजीपूर्वक वाचावी. भरतीची पुर्ण जाहिरात व अर्ज खाली दिले आहेत.

Thane City Police Bharti 2023 : Various vacancies are to be filled at the establishment of Police Commissioner Thane City Office. Applications are invited from the candidates fulfilling the mentioned conditions for filling up the following vacancies. Eligible and interested candidates should submit their applications at the earliest.

◾भरती विभाग : अपर पोलीस आयुक्त, पोलीस आयुक्त ठाणे द्वारे जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.
◾भरती प्रकार : सरकारी विभागता नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी.
◾भरती श्रेणी : राज्य सरकार श्रेणी अंतर्गत ही भरती केली जात आहे.
◾शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
◾मासिक वेतन : 28,000 रूपये (पदानुसार मासिक वेतन वेगवेगळे आहे.)
◾ठाणे पोलीस भरतीची जाहिरात व अर्ज खाली दिले आहेत.

◾अर्ज सुरू होण्याची दिनांक : जाहिरात प्रकाशित झाल्यापासून पुढे अर्ज मागविण्यात आले आहेत.
◾अर्ज पद्धती : ऑफलाईन (Offline) पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत.

News

◾निवड प्रक्रिया : लेखी परिक्षा, मुलाखत.
◾वयोमर्यादा :▪️नियुक्तीच्या वेळी कमाल वयोमर्यादा 62 वर्षापेक्षा जास्त नसावे.
◾भरती कालावधी : सदर नेमणूक हया करार नियुक्ती पध्दतीने प्रथमतः 11 महिन्यांसाठी करण्यात येतील. 11 महिन्यानंतर आवश्यक असल्यास करारनाम्याची मुदत वेळोवेळी (जास्तीत जास्त 3 वेळा 11 महिन्याकरीता) वाढविता येईल.
◾पदाचे नाव : विधी अधिकारी गट अ, विधी अधिकारी गट ब, विधी अधिकारी.
◾ वेतन : 23,000 ते 35,000 रूपये मासिक वेतन दिले जाणार आहे.
◾व्यावसायिक पात्रता : विधी अधिकारी गट अ पदाकरीता शैक्षणिक अर्हता, वय व अनुभव : 1] उमेदवार मान्यप्राप्त विद्यापीठाचा कायदयाचा पदवीधर असेल तो सनद धारक असेल. 2] विधी अधिकारी गट अ या पदासाठी वकील व्यवसायाचा किमान 07 वर्षांचा व विधी अधिकारी गट व व विधी अधिकारी या दोन्ही पदांसाठी वकील व्यवसायचा किमान 05 वर्षे अनुभव आवश्यक राहील.उमेदवार गुन्हेगारीविषयक, प्रशासनिक अशा सर्व प्रकारच्या कायदयाची स्थिती तथा विभागीय चौकशी इत्यादी बाबतीत ज्ञान संपन्न असेल. ज्यामुळे कायदेविषयक कार्यवाही तो कार्यक्षमतेने पार पाडू शकेल. 3] उमेदवारांस मराठी, हिंदी व इंग्रजी या भाषेचे पुरेसे ज्ञान असेल. तसेच संगणकाचे पुरेसे ज्ञान असणे आवश्यक आहे.
◾रिक्त पदे : 014 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत.
◾नोकरी ठिकाण : ठाणे (Government Job In Thane)
◾अर्ज स्विकारण्याची अंतिम दिनांक : 20 नोव्हेंबर 2023 पर्यंत फक्त अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे.
◾अर्ज पाठवण्याचा पत्ता : पोलीस आयुक्त, ठाणे शहर, क्रिक नाका, सिडको रोड, ठाणे (प), ता. जि. ठाणे पिन नं. 4600601.
◾अधिक माहितीसाठी वरील PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचा.



Source link

Post a Comment