-->

मोठीभरती : महापारेषण मध्ये 02541 पदांची सरळसेवा भरती जाहीर 2023 | वेतन - 30,000 रूपये | MahaPareshan Bharti 2023


महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण (महापारेषण) मध्ये विविध पदांची तब्बल 02541 पदाची रिक्त पदे एकत्रित करुन अनुशेषप्रमाणे सरळसेवा पद भरती करायची आहे. त्या करीता अर्हतापात्र उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज ऑनलाईन (Online) पध्दतीने मागविण्यात येत आहेत. पात्र व इच्छूक उमेदवारांनी लवकरात लवकर आपले अर्ज सादर करावेत. विद्युत विभागात नोकरी मिळवण्यासाठी चांगली व मोठी संधी निर्माण झालेली आहे. महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी मर्यादित या कंपनी येथे रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी नवीन जाहीर केली आहे. भरतीची जाहिरात महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण व मुख्य महाव्यवस्थापक (मानव संसाधन) द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. पात्र व इच्छूक उमेदवारांनी खाली दिलेली PDF जाहिरात अर्ज करण्यापुर्वी काळजीपूर्वक वाचावी. भरतीची पुर्ण जाहिरात व ऑनलाईन अर्ज लिंक खाली दिली आहे.

◾भरती विभाग : महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण व मुख्य महाव्यवस्थापक (मानव संसाधन) द्वारे जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.
◾भरती प्रकार : विद्युत विभागात नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी असून आजचं ऑनलाईन अर्ज करा.
◾भरती श्रेणी : राज्य सरकार श्रेणी अंतर्गत ही भरती केली जात आहे. (निमशासकीय)
◾पदाचे नाव : विविध पदांची भरती (मूळ जाहिरात पहा)
◾रिक्त पदे : 02541 पदे भरण्यात येणार आहेत. नोकरी मिळवण्यासाठी मोठी संधी निर्माण झालेली आहे.
◾मासिक वेतन : 30,000 रूपये (पदानुसार मासिक वेतन वेगवेगळे)
◾शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)

News

◾उमेदवारास मराठी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक आहे.
◾भरतीची पुर्ण जाहिरात व ऑनलाईन अर्ज करण्याची लिंक खाली पहा.

◾अर्ज पद्धती : ऑनलाईन (Online) पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत.
◾वयोमर्यादा : १८ वर्षे ते ३८ वर्षे.
◾भरती कालावधी : विद्युत सहाय्यक (पारेषण) या पदी निवड झालेल्या उमेदवारांना प्रथम ३ वर्षांच्या कंत्राटी कालावधीकरीता नियुक्ती देण्यात येईल. त्यानंतर प्रत्येक वर्ष संपल्यावर त्यांच्या मागील वर्षाच्या कामाचा आढावा घेण्यात येईल. त्यांचे काम समाधानकारक असल्यास त्यांचा कंत्राटी कालावधी चालू ठेवण्यात येईल.
◾अर्ज सुरू होण्याची दिनांक : 20 नोव्हेंबर 2023 पासून अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू होणारं आहे.
◾पदाचे नाव : विद्युत सहाय्यक (पारेषण), वरिष्ठ तंत्रज्ञ, तंत्रज्ञ 1, तंत्रज्ञ 2
◾व्यावसायिक पात्रता :🔹विद्युत सहाय्यक (पारेषण) – राष्ट्रीय व्यवसाय प्रशिक्षण परिषद (NCTVT), नवी दिल्ली यांनी प्रदान | केलेले वीजतंत्री या व्यवसायातील राष्ट्रीय शिकाऊ उमेदवारी प्रमाणपत्र धारक.
◾परिक्षा शुल्क :▪️खुल्या प्रवर्गातील – रु. ५००/-
▪️मागासवर्गीय, आर्थिक दृष्ट्या दुर्बल व अनाथ – रु. २५०/-
▪️दिव्यांग व माजी सैनिक – परिक्षा शुल्क भरण्यापासून सूट देण्यात आली आहे.

◾नोकरी ठिकाण : संपुर्ण महाराष्ट्रात.
◾निवड पध्दती : ऑनलाईन अर्ज यशस्वीरित्या सादर केलेल्या सर्वच उमेदवारांना ऑनलाईन परिक्षेस बोलविण्यात येईल.
◾ऑनलाईन अर्ज सादर करण्याची पद्धत : फक्त ऑनलाईन पध्दतीने कंपनीने उपलब्ध करुन दिलेल्या URL Link द्वारे भरलेले अर्ज स्विकारले व विचारात घेतले जातील.
◾अर्ज स्विकारण्याची अंतिम दिनांक : 10 डिसेंबर 2023 पर्यंत फक्त अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
◾अधिक माहितीसाठी वरील PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचा.



Source link

Post a Comment