-->

शिक्षक भरती सरकारने केली फसवणूक, निवृत्त शिक्षकांना पुन्हा नोकरी

 नमस्कार मित्रांनो...!

शिक्षक भरती बाबतीत एक लक्षात घ्या सरकारला आतापर्यंत एक कारण होते की आम्ही तयार आहोत.
परंतु High Court ने Stay आणलेले आहे. त्यामुळे नवीन शिक्षक भरतीला विलंब होत आहे.
आतातर
दि 7 जुलै 2023 ला शिक्षकभरती वरील Stay  High Court ने उठविले आहे.
   
       आता सरकारकडे नवीन शिक्षक भरती केल्याशिवाय मार्ग नाहीच/नव्हते

      म्हणून सरकारनी त्यातूनही अजून एक पळवाट शोधून काढलेली आहे. ती म्हणजे कंत्राटी भरती.
     हा चालढकलपणा सुरू करणे कितपत योग्य आहे. हे सरकारला कळायला नको का?

      आपण Tait धारकांनी पण ही कंत्राटी भरती होऊच न देणे या साठी जे आंदोलन करत आहेत त्यांना आपण सर्वांनी पूर्ण पाठिबा द्यायला हवा.
    जर ही तात्पुरती कंत्राटी भरती झाली तर त्यात आपलेच नुकसान जास्त होणार आहे.    

     या कंत्राटी भरतीमूळे सरकारचे काम पार पडत राहणार आहे,
शाळा पण चालू राहतील, काही दिवसांनी दिवाळी/दिवाळीनंतर पुढे निवडणूका चालू होतील. आपली शिक्षक भरती ही एका टप्प्यात होणार आहे की टप्प्याट होणार आहे. ते स्पष्ट करून दिलेले नाही परंतु वेळोवेळी मा. मंत्री केसरकर साहेब म्हणत आले आहेत की शिक्षक भरती टप्प्य टप्प्यात होणार आहे म्हणून.
   जर टप्प्यात भरती होणार असेल आणि पहिले काही टप्पे पार पडल्यानंतर ती टप्प्यातच अडकून जाईल व पुढे ही शिक्षक भरती गुलदस्त्यात गेल्याशिवाय राहणार नाही.
     म्हणूनच शिक्षक भरती लवकरच सुरू करण्यास भाग पाडणे व शक्यतो शिक्षक भरती एकाच टप्प्यात करणे यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करायला हवे.

   सध्याचे महाराष्ट्रातील राजकारण पाहता राज्याचे तसेच प्रत्येक पक्षाचे राजकारण वेगवेगळ्या वाटेला चाललेले/निघालेले आहे. यातून एकच मार्ग आहे.
  
        तो म्हणजे कंत्राटी भरती टाळून नवीन शिक्षक भरती प्रक्रिया २०२३, पवित्र पोर्टलवर लवकर चालू करण्यास सरकारला भाग पाडणे.


अपले उद्दिष्ट आता...!

1)कंत्राटी भरती होऊ न देणे.

2) पवित्र पोर्टलमध्ये जाहीराती प्रकाशित करून लवकरात लवकर नवीन शिक्षक भरती ला सुरूवात करणे

3) नवीन शिक्षक भरती ही एकाच टप्प्यात पार पडावी यासाठी प्रयत्न करणे.

     सध्य शिक्षक भरतीत ना याचिकेचा अडथळा आहे ना की प्रशासनाचा
   आता अडचण ही फक्त सरकारने घातली आहे. व नवीन निती वापरून आपल्या समोर अडचण निर्माण करत आहे. आता आपण त्या अडचणी चा सामना करून ती हाणून पाडली पाहिजे विजय 👊💥 आपलाच आहे. शिक्षक भरतीला लटकत ठेवण्याचाच सरकारचा स्पष्ट हेतू यातून दिसून येतो आहे.
शिक्षक भरती सरकारने केली फसवणूक, निवृत्त शिक्षकांना पुन्हा नोकरी


News

Post a Comment